बल व उत्साहवर्धक शुक्रधातु
मज्जाधातु कडून शुक्राग्निकडून शुक्रधातु या ७व्या व शेवटच्या धातुत परिवर्तन होते.
शुक्रधातु हा सप्तधातुंचे व प्राणांचे व प्राणाचे एक स्थान पुरुषांप्रमाणे स्त्री व बालकांमधेहि असतो.
-कार्य-
धैर्य,निर्भयता,उत्साह आदि मनाचे गुण तर बल,पुष्टि विरूद्ध लिंग विषयिचे आकर्षण
व गर्भोत्पत्तिसाठी बिजत्पति ही सर्व कार्य शुक्रधातु करतो.
व गर्भोत्पत्तिसाठी बिजत्पति ही सर्व कार्य शुक्रधातु करतो.
-स्थान-
ज्या प्रमाणे उसामधे रस,दह्यामधे तूप,तीळामध्ये तेल दिसत नसले तरी ओतप्रोत भरलेले असते तसेच शरीरात शुक्र दिसत नसले तरी प्रत्येक अणुरेणुत व्यापलेले असते.
मैथूनाच्या वेळेस किंवा क्वचित मैथूनाच्या केवळ स्मरनाने सर्वांगात व्यापुन राहिलेले शुक्र लिंग मार्गाने शरीरा बाहेर पड़तो....चरक चिकित्सास्थान
-शुक्रधातु व दोष-
संबंध प्राकृत कफदोषाशी आहे. हे दोघी निरोगी रहिल्यास रोग प्रतिकार शक्ति उत्तम राहते.
-प्रमाण-
अर्धी ओंजळ.
शुक्रक्षयाची लक्षणे-
१.शरीर दुर्बल होते.
२.वारंवार तोंड सकते,शुष्क पड़ते.
३.अंग गळूण जाते व कष्ट न करता थकायला होते.
५.मैथूनशक्ति समयी शुक्रस्राव कमी किंवा अजिबात होत नाही.
६.क्वचित प्रसंगी शुक्रासह रक्तस्रावहि होतो.
७.लिंग व योनीच्या ठिकाणी वेदना होतात.
८.अंग दुखते,लहान मोठे सर्व सांधे दुखतात.
९.वात व पित्त प्रकुपित होतो.
१०.नैराश्य येते,उत्साह नष्ट होतो.
स्मरणशक्ति,एकाग्रता,आकलनशक्ति,कल्पकता कमी होते.
अतिप्रमाणात मैथुनासक्ति हे शुक्रक्षयामागचे मुख्य कारण होय.हस्तमैथून,मैथुनासंबंधी वाचन व दृश्य पाहणे,मैथुनाचि कल्पना करणे,ह्या सर्वांच्या अतिरेकाने शुक्रस्त्रावाला सुरुवात होते आणि वरील सर्व गंभीर लक्षने दिसू लागतात.
याखेरिज अतिचिंता,अति मानसिक श्रम, अति शारीरिक श्रम,रुक्ष व निःसत्व आहार,दीर्घकालीन व्याधि,म्हातारपन ही शुक्रक्षयाची कारण होत.
-
आहार-
आहार-
दूध,तूप,पंचामृत,बादाम,शतावरी कल्प,च्यवनप्राश,बृहनमोदक वगैरे रसायन,वाजीवर कल्प सेवन
करावे.आँवला,गोक्षुर,अश्वगंधा,जेष्ठमध वनस्पति ही शुक्रक्षय भरून काढतो.
आहारस्य परं धाम शुक्रं तद रक्ष्यमात्मनः।
क्षयो हास्य वहून रॊगान मरणं वा नियश्चति।।



























