अस्थि धातू

  • जनवरी 24, 2020
  • By Dr.vivek Mahajan
  • 0 Comments

-दृढ़ता देणारा अस्थिधातु-

मेदधातुचे अस्थाग्निकडून पचन झाले की सर्वात कठिन धातू तयार होतो अस्थि, म्हणजे हाडे .
शरीराची उंची ही सर्वस्वी अस्थिधातुवर अवलंबून असते.
हाडे तयार होण्यासाठी पृथ्वी अग्नि आणि वायु ही तीन महाभूते आवश्यक असतात.

-अस्थिक्षयाची लक्षणे-
१.केस गळतात,नखे तूटतात,दाँत झिजतात.
२.त्वचा रुक्ष व खरखरित होते.
३.सांधे सैल होतात व ढीले झाल्यासारखे वाटतात.
४.हाडे टोचल्याप्रमाणे वेदना होते.
ऑस्टियोपोरोसिस
हा अस्तिक्षयामुळे आजार होतो.

-पोषक आहार-
दूध,तूप,गहु,खारिक,अक्रोड,
तर औषधांपैकी बाभळीचा डिंक मोति भस्म,प्रवाड भस्म,शौक्तिक भस्म,कुकूटांडत्वक भस्म.
अस्थिक्षयात दूधाचा आणि तुपाचा बस्तिदेखील उत्तम.
हाडे मजबूत होण्यासाठी
 दूध,तूप,डिंकाचा लाडू,खारिक वगैरे गोष्ठींचे नियमित सेवन करावे.

आयुर्वेदातिल मोती भस्म,प्रवाल भस्माचा मात्र उत्तम फायदा होतो.कारण ही ठंड असतात.

-अस्थि रोग-
१.अध्यास्थि-हाडावर हाड़ वाढने,उदा.टाचेचे हाड़ वाढने.
२.अधिदंत-दुहेरी दाँत येणे.
३.अस्थिभेद-हाड़ मुडने.
४.अस्थिशुल-हाडात वेदना होणे.
५.विवर्णता-त्वचेचा वर्ण बदलने.
६.दत्ताभेद-दाताचे टवेल उडने.
हे सर्व विकार बहुधा अस्थिधातुत वात वाढल्याने होतात.

अस्थि हे वाताचे स्थान असल्याने बस्ती हा सर्वोत्तम उपाय होय.

-धन्यवाद-
🌹डॉ.विवेक महाजन🌹

You Might Also Like

0 टिप्पणियाँ