मज्जाधातु
अस्थिधातुचे मज्जाग्निकडून पचन झाले की मज्जाधातु(६) तयार होतो.
शरीराचे विशेषत: हाडांचे स्नेहन करने.शरीराची शक्ति वाढवने व पुढील शुक्रधातुचे पोषण करने ही सर्व कार्य मज्जाधातु करत असतो.
मोठ्या हाडांमधील पोकळीत हा धातु असतो.मेंदू,डोळे हे मज्जाधातु होत.
पाठिच्या कणांमध्ये असणारा मज्जारज्जु व त्यातून शरीरात पसरणारे चेतातंतू हे मज्जास्वरूप असतात.
पाठिच्या कणांमध्ये असणारा मज्जारज्जु व त्यातून शरीरात पसरणारे चेतातंतू हे मज्जास्वरूप असतात.
-संबंध-
मज्जाधातु चा संबंध कफदोषाशी असतो.
-प्रमाण-
एक ओंजळ होय.
-मज्जाक्षयाची कारणे-
१.अल्पशुक्रता-शुक्रधातु कमी होने.
२.पुर्वभेद-सांध्याच्या ठिकाणी वेदना होतात.
३.अस्थिनिस्तोद-हाडांच्या ठिकाणी टोचल्याप्रमाणे दुखते.
४.अस्थिशिर्यता-हाडे अशक्त व पोकळ होतात यालाच ऑस्टियोपोरोसिस म्हणतात.
५.दुर्बलता-शरीर दुर्बल होणे.
६.वातरोग-विविध वातरोग उदा.पक्षाघात,मल्टीपल स्क्लेरोसिस,पार्किंसन.
आपण खातो तो बदाम बि च्या आत असतो,त्यामुळे तो मज्जापोषक असतो.जर्दाळू च्या आत असणारा बदाम तर विशेषत्वाने मज्जापोषक समजला जातो.बियांतिल गोळंबी,अक्रोड हेही वर्धन व पोषण करतात.
-मज्जापोषक रोग-
तमोदर्शन-अंधारी येणे,मुर्छा येणे.
भ्रम-चक्कर येणे.
पूर्वभेद-सांध्यामधे असह्य वेदना होणे.
-नोंद-
मज्जाधातु दूषित होण्यामधे विरुद्ध अन्नसेवन हे एक महत्वपूर्ण कारण आहे.
अन्न म्हणजे विरुद्ध अन्न,उदा.मध व गरम पाणी,दूध व फ़ळे,मिठ व दुध.
अन्न म्हणजे विरुद्ध अन्न,उदा.मध व गरम पाणी,दूध व फ़ळे,मिठ व दुध.
-उपचार-
पंचकर्मातील बस्ती,विरेचनादी उपक्रम आदि करावे लागतात.षष्टि साळीपिंडस्वेदन(औषधि काढ्यात विशेष प्रकारचा तांदूळ भिजवुन केलेल्या भाताने सम्पूर्ण शरीराला केलेला मसाज ),शिरोबस्ति नेत्र तर्पण होय.
🏵️धन्यवाद🏵️
डॉ.विवेक महाजन.
🏵️धन्यवाद🏵️
डॉ.विवेक महाजन.




0 टिप्पणियाँ