मेद धातु

  • जनवरी 18, 2020
  • By Dr.vivek Mahajan
  • 1 Comments


👈स्निग्धता देणारा मेदधातु👉

👉मांसधातुचे मेदाग्नि कडून पचन झाले असता मेदधातु तयार होतो.मेद म्हणजे चरबी,मेदधातु हा सर्वाधिक वाढत असल्याने त्याचा परिणाम पुढे आयुष्यभर सोसावा लागतो।

-कार्य-
👉याचे मुख्य कार्य म्हणजे स्निग्धता देने,घाम तयार करने,शरीरात घट्टपना आणणे,बल देने व हाडांचे पोषण करने हि होत।

-स्थान-
👉मुख्य स्थान म्हणजे हातापायाची बोटे,मनगट,घोटा ई.सांध्याच्या ठिकाणी मेद असतो।

-संबंध-
👉याचा संबंध कफदोषाची आहे कारण दृढ़ता देने या कार्यवरुन संबंध लक्षात येतो।

-प्रमाण-
👉आपल्या २ ओंजळी इतका  मेदधातु प्रत्येक व्यक्तिमधे असतो।

-मेदक्षयाची लक्षणे-कमतरता-
१.कंबर बधिर होने,वजन कमी होने.
२.सांधे पोकळ झाल्यासारखे वाटने.
३.फार परिश्रम न करता थकल्यासारखे वाटने.
४.डोळे निस्तेज होणे.
५.त्वचा व केस इ.ठिकाणी रुक्षता जानवणे.
६.पोट खपाटीला जाने.
७.प्लीहा (स्प्लीन) आकाराने वाढने.

-लक्षणे-अति-
१.पोट व नितंबाच्या ठिकाणी मेदाचा संचय प्रारंभ.
२.थोड्या हालचालीनेही थकायला होने,दम लागने.
३.शरीरावर तेलकटपणा वाढने,
४.अतिप्रमानात घाम येणे व त्यामुड़े शरीराला दुर्गंध येणे.

-रोग-
मेद वातादिदोषांमुळे बिघडल्यास खालील रोग होवू शकतात
१.वृद्धि-अंडकोषाचा आकार.
२.ग्रंथी-मेदाच्या गाठी बनने.
३.आंत्रवृद्धि-हर्निया.
४.अति स्थोल्य-जाडी वाढणे.
५.गलगुंड-गालगुंड.
६.ओष्ठप्रकोप-ओठ वाढने.
७.मधुमेह होणे.
८.अति स्वेद-घाम फार येणे.

-आहार-

👉जव,कुडिथ,मुग,परवड,तुर वगैरे मेद,कफशामक पदार्थांचे प्रमाण अधिक वाढवावे तर औषधात मध,सुंठ,त्रिफळा,तक्रारीष्ट,लोहभस्म
आदि वैद्याच्या सल्याने घ्यावे.

👉मेदधातु वाढलेल्या व्यक्तीचे आयुष्य कमी होते,सतत अनुत्साह प्रतीत होतो,मैथूनशक्ति लोप पावते,दौबर्ल्य जाणवते.तसेच मेद क्षयाने अतिकृश झालेल्या व्यक्तीचे सहनशीलता कमी झालेली असते.श्रम सहन होत नाही,भूक व तहान लागली की थांबता येत नाही.ठंडी व उन्हाचा त्रास होतो.

👉जठराग्नि व धातुग्निचि ताकद वाढवून पचन व्यवस्थित होवू शकेल यासाठी उपचार केले असता चरबी(cholesterol)  व स्निग्धाम्ले (triglycerides) कमी होवू शकतो.

🌹धन्यवाद🌹
डॉ.विवेक महाजन.

You Might Also Like

1 टिप्पणियाँ