मांस धातु

  • जनवरी 10, 2020
  • By Dr.vivek Mahajan
  • 2 Comments


सप्तधातु-मांस



रक्तधातुचे मांसाग्निकडून पचन झाले की मांसधातु तयार होतो।
शरीराचा आकार व बांधा ठरविनारा मांसधातु।

-कार्य-
शरीराचे पुष्टि करने हे मुख्य कार्य असून चालने,पळणे,ऊठणे,बसने हे द्वितिय कार्य होय।

-गुण-
मांसधातु पिच्छिल म्हणजे बुळबुळीत,घन म्हणजे घट्ट,व श्लष्टा म्हणजे गुळगुळीत तसेच किंचित लाल असतो।

-मांसक्षयाची लक्षणे-
१.वजन कमी होते,गाल खोल जातात,नितंब सुकतात.
२.शरीराची शक्ति कमी होते.
३.इन्द्रिय दुर्बल होतात,त्वचा व शरीर रुक्ष होते.
४.शरीर टोचल्याप्रमाने वेदना होतात.
५.सांध्यामधे वेदना होतात.
६.रक्त वाहून नेणाऱ्या शिरांमधे शीतलता येते.

-आहार-

👉खजूर,बादाम लोनी,मांसाहार करणाऱ्यांसाठी मासे वगैरे मांस सेवन करण्याने मांसपेशि चे पोषण होते.
👉हिवाळ्यात बाभळीचा डिंक ,खारिक, पासून बनविलेला
डिंकाचा लाडू खावा।
👉औषधांपैकी विदारी कंद ,शतावरी,अश्वगंधा,आत्मगुप्ता,गोक्षुर,मुसडी वगैरे तसेच,
👉औषध कल्पांपैकी जेष्टाघृत,द्राक्षादय घृत,बलादि घृत उत्तम होत।

-मांसज रोग-

१.अधिमांस-मांसावर मांस चढ़ने।
२.अबुर्द-गाठी तयार होने।
३.गलशालुक-गळ्यात मांसचे अंकुर असलेले गांठ येणे।
४.पुतीमांस-एखाद्या विशिष्ठ ठिकाणी मांस कूजने।
५.अलजी-पुटकुळया।
६.गंडमाळा-गळ्याच्या भोवति गाठी वाढने।
७.किल-मोड येणे।

मांसज रोगावर शोधन म्हणजे विरेचन,बस्ती तसेच गरज पडल्यास शस्त्रक्रिया,क्षारकर्म,अग्निकर्म(डाग देने) असेही उपचार करावे लागतात

🌷धन्यवाद🌷
डॉ.विवेक महाजन.

You Might Also Like

2 टिप्पणियाँ